भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून मैदानात   

कोलंबो :  भारतात सध्या आयपीएल 2025 जोरात सुरू आहे पण महिला क्रिकेट संघ श्रीलंकेत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघ श्रीलंकेत एकदिवसाची तिरंगी मालिका खेळत आहे. ज्यामध्ये टीम इंडिया आणि श्रीलंका तसेच दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.ही मालिका सुरू झाली आहे आणि पहिला सामना श्रीलंका आणि भारत यांच्यात कोलंबोमध्ये खेळला जात आहे.
 
या सामन्यात भारतीय संघाचे सर्व खेळाडू हातावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानात आले होते. खरेतर, अलिकडेच पहलगाममध्ये एक दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात अनेक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या दहशतवादी हल्ल्याचा देशभर निषेध केला जात आहे आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने मृतांना श्रद्धांजली वाहत आहे. आता श्रीलंकेविरुद्धचा भारतीय संघही या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना हातावर काळी पट्टी बांधून श्रद्धांजली वाहिली.

Related Articles